भाग 1: वेदनेपासून आनंदापर्यंत
संपूर्ण विश्वाच्या आनंद समाजवासी आणि आश्रमाच्या स्वामीगणांना दिलेले प्रवचन
जगातील सर्वात भीतिदायक गोष्ट आहे वेदना
सर्व जीवित प्राणी एका गोष्टीला घाबरतात, व ती आहे वेदना. जर तुम्ही खोलवर पाहिले तर ध्यानात येईल की माणसे मरणाच्या वेळेस होणाऱ्या वेदना व यातनांना घाबरतात तितके ती मृत्युला घाबरत नाहीत. अनेक माणसे भयभीत आहेत गरीबीने, काही नात्यांनी, काही आजारांनी - पण सर्व भयांचे मूळ आहे वेदना. मनुष्याच्या सर्वच्या सर्व भयांचे कारण आहे वेदनेचे भय. यामुळेच पीडारहित असलेला मोठ्यात मोठा आजार मनुष्य सहन करू शकतो, परंतु साधारण डोकेदुखी सहन करणे त्याला कठीण होऊन जाते.
वेदना काय आहे ?
चला, आपण या विषयावर खोलात जाऊन शोध घेऊया. वेदना शारीरिक, मानसिक वा भावनात्मक असू शकते. या सर्वात शारीरिक वेदनेची चिंता सर्वात कमी आहे.
एका प्रकारे ही शरीराची मूलभूत गरजही आहे. जरा विचार करा, जर आपल्याला कोणतीच वेदना होत नसेल तर आपण आपला चेहरा व हात-पायसुद्धा तसेच बनवू शकतो जसे आपण केस बनवितो! आपण निश्चितच आजच्या किशोरवयीन मुलांसमोर असेच आणू शकलो नसतो! यातील विनोद बाजूला ठेवून, वेदना हे शारीरिक ज्ञानाचे प्रतीक आहे. वेदना मनुष्याच्या अस्तित्वास समग्र बनविते.
आपल्या विश्वासाच्या विरुद्ध, आपल्यातील बहुतांश जण आपल्या संपूर्ण शरीरासह जगत नसतात. आपण खालील भागांची उपेक्षा करून वरील भागांमध्ये रहात असतो. माझे म्हणणे नीट समजण्यासाठी, हा प्रयत्न करा : आपले डोळे बंद करून आपल्या अस्तित्वाची आपण कल्पना करा. आपले नाव घ्या. तुमच्या शरीराचे कोणते अंग तुमच्या लक्षात येते? निश्चित रूपाने तुमचा चेहरा व हात, निश्चितच तुमच्या शरीरातील खालील अंग नाही. हे दाखविते की, आपण प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक हात-पायामध्ये पूर्णपणे जीवित नाही. इतकेच नव्हे तर आपल्या मनामध्येही आपण हा फरक करतो. शरीराचा वरील भाग मालक व खालील भाग नोकर आहे. जेव्हा तुम्ही हा फरक बनवता, नकळतच, तुमची शक्ती व जीवनशक्ती शरीराच्या ज्या अवयवांवर आपण लक्ष केंद्रीत करतो त्यामध्ये विभागुन राहते. तुमच्या गालांना स्पर्श करा. एक संवेदनाशील, जीविताची जाणीव होत नाही का? आता आपल्या पायांना स्पर्श करा. अशाप्रकारचाच तुम्हाला अनुभव होतो का? लक्ष द्या की, आपण आपल्या गालांमध्ये जेवढे जीवित आहोत तितके आपल्या पायांमध्ये नाही. असे का बरे आहे? वास्तविक विश्वास ठेवणे कठीण आहे. याचे कारण आहे शरीराच्या या भागावर तुमच्या लक्षाचा अभाव असतो.