मन वेदनेस नियंत्रित करू शकतो का ?
भावनात्मक व मानसिक स्तरावर, वेदना ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात निर्णयाचे परिणाम आहे. वर्तमान क्षणाच्या प्रतिरोधाच्या कारणाने नेहमी वेदनेचा जन्म होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेवढ्या वेळी तुम्हाला वेदनेची जाणीव होईल तितक्या वेळी ती आपल्या मागे अंश सोडून जाते. ती वेदनेची जाणीव तुमच्या शरीरात राहून जाते. हळूहळू ही गोळा झालेली वेदना तुमच्या सर्व बाजूंना नकारात्मक ऊर्जा तयार करते, जिला आपण शारीरिक वेदना म्हणतो. ही शारीरिक वेदना आपल्या अधिकांश वेदनांच्या प्रकारांकरिता जबाबदार आहे व नियंत्रित करीत असते.
संशोधनाअंती दिसून आले आहे की, भावनात्मक असंतुलन भौतिक शरीरात खोलवर गडबड निर्माण करू शकते. उदाहरण द्यायचे तर लैंगिक इच्छेचे दमन केल्याने पाठदुखी होऊ शकते किंवा खांद्यांवर अधिक जबाबदाऱ्यांमुळे खांदेदुखी होऊ शकते.
गर्दीने भरलेल्या बसमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या माणसांबरोबर प्रवास करता. पण आपला अंतरात्मा त्यांना स्पर्श करणार नाही -तुमचे मन, तुमची चेतना या गोष्टीची परवानगी देत नाही. याबदल्यात आपला अंतरात्मा आपल्या आतच संकुचित पावतो.
वेदना नेहमी वर्तमानाचा प्रतिरोध केल्याने निर्माण होते.
कोलकात्यामध्ये दोन आश्रम होते ज्यांच्या अध्यक्षांमधील संबंध काही ठीक नव्हते. एके दिवशी एका लोकमान्य व्यक्तीचा प्रतिनिधी यांपैकी एका अध्यक्षाकडे आला व त्यांना आपल्यासमवेत दुसरा आश्रम दाखविण्यास सांगू लागला. तो अध्यक्ष खूप त्रासलेला होता - तो नकारही देऊ शकत नव्हता की जाऊ इच्छित नव्हता. अचानकच त्या अध्यक्षांना मोठा ताप आला आणि त्यांचे आपले स्थान सोडून जाणेही टळले! मी हे आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. तो प्रतिनिधी जातो न जातो तोच यांचा तापही ठीक झाला. आपण सर्वानी सोमवारच्या सकाळच्या सुस्तीचा अनुभव घेतला नाही काय ? इतकेच नव्हे, तर लहान मुलेही आपल्याला नावडीचा काम सांगितले गेले की आजारपणाची लक्षणे दाखवू लागतात - जसे शाळेत जाणे! मेंदू व शरीरापासून जे आपल्याला भिन्न दिशांना खेचू लागतात. यामुळेच तुम्ही स्वतःच स्वतःशी सहजपणे नाही आहात. ही असुविधाच आजार म्हणून ओळखली जाते.
एके दिवशी, एका परंपरावादी कुटुंबातील एक सुंदर युवक आमच्या निरामय केंद्रामध्ये आला. त्याची तकार होती आकस्मिक अंधत्व! त्याचे पालक रडू लागले आणि मला सांगितले की, मुलाचे आरोग्य खूपच चांगले आहे आणि तो एका आठबड्यापूर्वीच अंध झाला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याची दृष्टी त्रुटीरहित सिद्ध झाली आहे - पण तो पाहू शकत नाही! त्याच्या ऊर्जेचे काळजीपूर्वक निरिक्षण केल्यानंतर मी काही वेळ त्याच्याशी एकांतात व्यतित करण्याचे ठरविले. त्याच्याशी एकांतात बोलण्याची परवानगी मिळताच त्याने आपल्या सर्व चिंता माझ्यासमोर ठेवल्या. त्याने सांगितले की त्याचे एका मुलीवर प्रेम जडले आहे आणि त्याच्या आईवडिलांनी जबरदस्तीने त्या मुलीशी भेट घेण्यास त्याला विरोध केला आहे. मला त्वरित समस्येचे मूळ कारण समजले. त्या मुलाला मी त्या मुलीचा एक फोटो मिळविण्यास सांगितले आणि पुढील तीन दिवस सतत त्या फोटोवर लक्ष केंद्रित करायलाही सांगितले. त्याचे आईवडिल माझ्या या रूढीमुक्त इलाजाने आणि तेसुद्धा एका आध्यात्मिक व्यक्तीकडून मिळालेल्या इलाजाने आश्चर्यचकित झाले ! पण ते तंत्र कामी आले, तीन दिवसांतच मुलाची दृष्टी पूर्णपणे पूर्ववत झाली.
जेव्हा त्या मुलीला, जिला तो सर्वात अधिक पादू इच्छित होता, तिलाच न बघण्यास त्या मुलाला मनाई केली गेली तेव्हा त्याच्या अवचेतना मेंदूने निर्णय घेतला की तो आता काहीही पाहणार नाही. त्याचे अंधत्व गूढमनोविज्ञानाशी संबंधित होते. मस्तकची इंद्रियांवर काय प्रचंड शक्ती आहे! मस्तकच सर्व काही आहे!
भगवत् पुराणात उल्लेखित आहे : कृष्ण व राधेचा जन्म काही क्षणांच्या फरकाने झाला. राधा सर्व प्रकारे एक साधारण मुलगी होती - फक्त ती आपले डोळे उघडू शकत नव्हती. काही दिवसांनंतर, राधेची आई कृष्णाच्या घरी बाळ कृष्णाला बघायला गेली. तिने आपल्या नवजात मुलीलाही बरोबर घेतले. ज्या क्षणी राधा कृष्णाच्या समोर आली तिने सर्वात आधी कृष्णाला पाहिले. नंतर, मैत्रिणीने विचारल्यावर राधेने सांगितले, त्याच्याशिवाय तिथे पहायला होते तरी काय? मी कृष्णाकरिताच जन्म घेतला आहे. याकरिता डोळे उघडण्यासाठी मी कृष्णाच्या उपस्थितीची वाट बघत होते. ही केवळ एक गोष्ट असू शकते, मात्र शरीरावर मस्तकच्या प्रचंड शक्तीचे हे उदाहरण आहे. वास्तविक, आपण असे बोलू शकतो की, शरीराद्वारे मेंदूला लिहिलेले मागणीपत्र आहे वेदना - ज्यात सांगितले आहे की कुपया माझ्याकडेही थोडे लक्ष असू द्या! कारण तुमचे लक्ष ही तुमची ऊर्जा आहे. ज्या दिशेला तुम्ही लक्ष बळविता त्या दिशेला तुमची ऊर्जाही फिरते. तुम्ही तुमच्याकडे वेदनेला आमंत्रित करता! जसे सन्माननीय पाहुण्यांना आपण घरी बोलावतो तसे सर्व वेदनांना आपणच बोलावतो हे सांगितले तर कित्येक जणांना विश्वास होणार नाही. हेच खरे आहे.
निती मुदालियर एका भोजनालयात गेला आणि भरपूर प्रमाणात खाऊ लागला. गरम इडली, डोसा व जिलेब्यांनी भरलेल्या थाळी त्याच्या टेबलावर येऊ लागल्या. तो पोटभर जेवला. पोटभर जेवल्यानंतर त्याने बेटरना इशारा केला की त्यांनी आणखी जेवण आणू नये. वेटर थोड्या वेळाने एका लहान कागद घेऊन आला.
हे काय आहे? नितीने न कळल्याचा भाव आणून त्याला विचारले. तू हे माझ्याकडे का घेऊन आलास? मी अशी काही वस्तू मागविलेच नाही. याचप्रकारे, आपणही वेदनेला आपल्याकडे बोलावतो व आपले तणावग्रस्त जीवनशैली आणि खराब सवयी तुम्हा स्वतःलाच गोंधळात टाकतात व नंतर तुम्ही हे विसरून जाता, पण जेव्हा आजार वाढू लागतो तेव्हा तुम्ही तकार करू लागता.
कधी कधी तर आपण आपल्या आजाराचा आनंदही घेतो, अर्थात हे आपण स्वीकारत नाही. ज्या प्रकारे तुमचे लक्ष आपल्याकडे खेचले जावे याकरिता तुमच्या शरीराचा एखादा अवयव आजारी पडतो, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःही दुसऱ्याचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आजारी पडता. यात काहीही आश्चर्यकारक नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात, कोणालाही द्र्सर्याकडे बघायला बेळ नाही. जोपर्यंत तो आजारी पडत नाही ? ध्यान किंवा मनोयोग ही मूलभूत गरज आहे.
मनोविज्ञानाने हे सिद्ध झाले आहे की मनुष्य नव्वद दिवसांपर्यंत अन्नाशिवाय राहू शकतो, पण इतरांच्या ध्यान देण्याशिवाय तो चौदा दिवसांतच आपली शुद्ध गमावून बसतो कारण ध्यान ऊर्जा आहे, ही जीवनशक्ती आहे.
अर्थात ही बाबही आपल्याला ठाऊक नसेल की एखाद्याचे लक्ष प्राप्त करण्याची इच्छा इतकी जास्त असते की ते प्राप्त करून घेण्याकरिता आपण निम्न ऊर्जा बनवीतो व हसत हसत सर्दी (कोल्ड) इथपासून कॅन्सरपर्यंतही सहन करतो.
एखाद्या नातेसंबंधात, तुम्ही नेहमीच अवलोकन केले असेल की दोन्ही पक्ष एकमेकाचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न अर्थात लक्ष प्राप्त करण्याचे भिक्षापात्र पसरवून मागणी करीत असतात.काय तुम्ही कधी विचार करता? दोन भिकार्यांमध्ये सकारात्मक व एकमेकांच्या आवश्यकता पूर्ण करण्याचे नाते होऊ शकते का? वास्तवात आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष प्राप्त करण्याची भीक मागणे सोडून द्या. आपल्या संपूर्ण जागरूकतेशिवाय होणारा एक प्रकारचा सूक्ष्म व मनोविज्ञानासंबंधी भीक मागण्याचा हा प्रकार आहे जो शेवटी शारीरिक स्वरूपात भीक मागण्याहूनही अधिक धोकादायक आहे.
जीवन आपल्याला खूप काही शिकवितो. ते समजून घेणे आपली जबाबदारी आहे. पण आपण नेहमी झोपेत चालल्यागत तुप्त राहून जगत असतो. आपल्याला हेसुद्धा ठाऊक नसते की आपण आपल्याकडे कोणाला बोलावत आहोत. याचे उदाहरण मी एका लहानश्या गोष्टीतून देतो :
मोठ्या व्यावसायिक संस्थेमध्ये कार्यरत असलेला एक अभियंता दुपारी जेवणाकरिता नेहमी एकाच प्रकारे जेवण आणीत असे. ते विशेष प्रकारचे जेवण त्याला किती आवडत नाही याची तो नेहमीच तकार करीत असे आणि मग त्याचे सहकारी मित्र त्याला आपल्या समवेत जेवणात सहभागी करीत असत. त्या व्यक्तीची दुर्दशा पाहून सर्व मित्रांनी त्याला सल्ला दिला, तू तुझ्या पत्नीला तुझ्या आवडीचे काही बनवायला का नाही सांगत? किमान बदल म्हणून तरी? एकाच प्रकारचे हे जेवण तुला आवडत नाही याची तिला जाणीव नाही का ?
कोण बायको? तो व्यक्ती आश्चर्याने उद्गारला, मी तर अविवाहित आहे. मी माझे जेवण स्वतः बनवितो.
तुम्हाला हे वाचून कदाचित मजा वाटेल, पण हे खरे आहे : आपण आपले जीवनही काही अशाच प्रकारे जगत असतो. कमी जागरूकतेच्या कारणास्तव सुरुवातीला तर आपण वेदनेला स्वतः कडे बोलावतो, आणि मग त्याच्याबद्दल तकार करू लागतो आणि वेदनाशामक औषधाचा आसरा घेतो. लाजेची गोष्ट हीच आहे की आपल्याला या आजारांनी पीडित असल्याचेही कधी वाईट वाटत नाही. कारण सर्व संकटांचे मूळ कारण म्हणून आपण आपल्याला ओळखू शकत नाही. वेदनेची जबाबदारी आपण दुसऱ्यावरच टाकतो, आपल्या स्वत:वर कधी घेत नाही.
वेदनेचा इलाज काय आहे?
तर तुमच्या ध्यानाच्या अनुपस्थितीत वेदना जाणवीत असेल तर तिचा इलाज म्हणजे तुमची उपस्थिती आहे. आजारी अवयवांमध्ये तुमच्या उपस्थितीकरिता रस्ता बनविणारी एक साधारण व सुंदर स्व-निरामय असे ध्यानाचे तंत्र आहे. पुढच्या वेळेस तुम्हाला कधी वेदना जाणवू लागेल तेव्हा याचा प्रयोग करा. उदाहरण : पायाची वेदना. वेदनाशामक औषधांच्या तुलनेत निश्चितच हा एक चांगला इलाज आहे. वेदनाशामक औषधांचा अप्रत्यक्ष परिणाम कधी कधी मूळ तकारीपेक्षाही वाईट होतो.
ध्यान : एका काळोख्या खोलीत झोपा. आपल्या संपूर्ण शरीराला विसरण्याचा सचेत प्रयत्न करा. जिथे वेदना असेल त्या अंगांवर आपले लक्ष केंद्रित करा. दुखणाऱ्या अवयवाची जाणीव होताच, जाणूनबुजून आपल्या मेंदूतून वेदना किंवा दुखणे शब्द त्याग करण्याचा प्रयत्न करा. तुमची मानसिक बडबड तुम्हाला सतत सांगण्याचा प्रयत्न करील की तुम्हाला वेदनेची जाणीव होत आहे. ती बंद करा. खोल जाऊन जाणीव घ्या, मोकळ्या मनाने अनुभव घ्या. तुमच्या मेंदूत झाकण्याचा प्रयत्न करून तेथे काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लगेचच जाणीव होईल की तुमचा मेंदू वेदना वाढवून बघत आहे.
तुमची पूर्ण जागरूकता वेदनेच्या केंद्रावर आणा आणि असे केल्यावर हे त्वरितच आकुंचित होऊन वेदनेच्या अगदी केंद्रबिंदूबर खूप लहान होऊन जाईल.
संपूर्ण स्वरूपात त्याच केंद्र बिंदूबर लक्ष केंद्रित करा व अचानक एका क्षणाला तुम्हाला जाणीव होईल की तुमची वेदना नष्ट झाली आहे व त्याची जागा घेतली आहे आनंदाने, परम सुखाने. अर्थात बेदना वा दु:ख आणि आनंदाचे मूळ एकच असल्याकारणास्तव ही एकाच जाणिवेची दोन रूपे आहेत. तुम्ही जर तुमच्या मित्राकडून किंवा व्यावसायिक मालिश करणाऱ्याकडून मालिश करवून घेतली असेल तर तुम्हाला हीच मालिश एका अनोळखी हातांनी केली तर अगदी शारीरिक हिंसा वादू लागते!
तुम्ही जर तुमच्या अनुभवाच्या सत्याला समजण्याचा प्रयत्न कराल तर ते सत्य असेल की वेदनेचे कोणतेही अस्तित्व असत नाही. वेदना वा दु:खाचे केवळ नकारात्मक अस्तित्व असते.
अंधाराप्रमाणेच, ही केवळ एक अनुपस्थिती आहे - जागरूकतेची अनुपरिशती. ज्याप्रमाणे उजेड येताच अंधार आपोआप नष्ट होतो त्याप्रमाणे जेव्हा जागरूकतेची ऊर्जा वेदनेवर केंद्रित होते तेव्हा वेदना आपोआप गायब होते. या प्रकारच्या ध्यानामुळे कोणत्याही प्रकारची वेदना दूर होऊ शकते. मी तुम्हाला याचा स्वतः अनुभव घेण्यास आमंत्रित करतो आहे, ध्यानाद्वारे तुमच्या दुखण्यावर मार्ग मिळवा व तुमच्या अंतरात्म्यामध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला साधन बनवा. तुम्हाला जाणीव होईल की वेदना हेच आनंदाचे दार बनले आहे.